Breaking News

माथेरान घाटात कारला अपघात; दोघे जखमी

कर्जत : बातमीदार – नेरळ- माथेरान घाटात चालकाचा ताबा सुटल्याने फियाट कार झाडावर आदळली. या अपघातात वाहन चालक हरीचंद किसनचंद देवनानी (नेरूळ) आणि त्याचा मित्र हरिराम गुरुदासमन पंजावणी (उल्हासनगर) हे दोघे जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

हरीचंद देवनानी आणि हरिराम पंजावणी हे दोघे  फियाट कारने माथेरानला फिरण्यासाठी आले होते. परतीच्या प्रवासादरम्यान माथेरान-नेरळ घाटातील जुमापट्टी येथील अवघड वळणावर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने फियाट कार आंब्याच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा जबर होता की वाहनाचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. अपघातात तरूणांच्या पायाला जबर मार बसला असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले. प्रवासादरम्यान ते मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply