Breaking News

भारतीय संस्कृती ‘लयभारी’

चिवे सुधागडमध्ये घडले संस्कृती व सणांचे दर्शन

पाली ः वार्ताहर

आपल्या अमूल्य संस्कृती व सणांना पुनरुज्जीवित करण्यासाठी व त्यांचे महत्त्व जनमानसात प्रभावीरीत्या पोहचावे आणि भावी पिढीला देखील आपली संस्कृती व सण यांची मौलिकता समजावी यासाठी लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्था चिवे सुधागड यांच्या वतीने नुकताच आपली संस्कृती व सणांचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद लाभला. आदिवासी महिला, पुरुष व लहान मुले यांची उपस्थिती लक्षणीय होती. श्रावण महिन्यात येणारे पवित्र सण जसे श्रावणी सोमवार, रक्षाबंधन, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोपाळकाला, तसेच वर्षभरात येणारे अनुक्रमे गणेशोत्सव, गौरी, दिवाळी, लक्षीपूजन, भाऊबीज मकरसंक्रात, गुढीपाडवा, बैलपोळा, अक्षय्य तृतीया, दसरा, होळी,  आषाढी एकादशी, महाशिवरात्र, धूळवड आदींसह विविध सण व उत्सव चलचित्रांमध्ये साजरे करून एक अनोखा आनंद सर्वांनीच उपभोगला. या वेळी महिलांनी ओवी गात जात्यावर दळण भरडले, तसेच प्रत्यक्ष दहीहंडी बांधून लहान मुले व महिलांनी गोपाळकाला साजरा केला, तसेच गणेशमूर्ती आणून भक्तिभावाने प्रतिष्ठापना केल्याचा देखावा या वेळी दाखवण्यात आला, तसेच रक्षाबंधन व भाऊबीज साजरी करण्यात आली. या वेळी नागाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. होळीचा सण हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सण देखील हुबेहूब साजरा करण्यात आला. या वेळी लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांतदादा लाड, कार्याध्यक्षा लताताई कळंबे, गजानन आंबेकर, नवशी मांडवकर, सीता हीलम, नवशी हीलम, सखूबाई ठाकूर, चेतना ठाकूर, विठ्ठल ठाकूर, अंजना ठाकूर, मनीषा यादव, शर्मिला ठाकूर देवता चव्हाण आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply