Breaking News

गव्हाण विद्यालयात नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन उत्सव

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रक्षाबंधन आणि आगरी कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा उत्सव हे दोन्ही सण हर्षोल्हासात साजरे करण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या समारंभात विद्यार्थिनींनी विद्यार्थी व शिक्षकांना आणि वृक्षांनाही राख्या बांधल्या.

या सृष्टीचे व पर्यावरण रक्षणसाठी वृक्ष व वनसंपदेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विद्यालयाच्या उद्यानातील वृक्षांना मा. प्राचार्या व इतर अध्यापक यांच्या हस्ते रक्षाबंधन करण्यात आले. या वेळी प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात तृप्ती पालये व पल्लवी मोकल या विद्यार्थिनींची भाषणे झाली, तर उपाध्यापक देवेंद्र म्हात्रे यांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या सणांचे पारंपरिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले.

विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत को ऑप. बँकेचे संचालक प्रमोद कोळी, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर, देवेंद्र म्हात्रे, विद्यार्थी व रयत सेवक उपस्थित होते. मानसी ठाकूर हिने सूत्रसंचालन केले. ज्योत्स्ना ठाकूर यांनी प्रास्ताविक केले, तर वर्गशिक्षक प्रदीप काकडे यांनी आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply