नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर नेमबाज अवनी लेखारा आणि बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांच्यासह भारतीय खेळाडूंची अखेरची तुकडी सोमवारी मायदेशी परतली. त्यांचे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. भारताने यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धांत विक्रमी कामगिरी करताना पाच सुवर्णपदकांसह एकूण 19 पदकांची कमाई केली.
टोकियो पॅरालिम्पिकची रविवारी सांगता झाल्यावर सोमवारी भारतीय खेळाडूंचे मायदेशी आगमन झाले. भारतात दाखल होणार्या अखेरच्या तुकडीत बॅडमिंटन, नेमबाजी आणि रिकर्व्ह तिरंदाजी क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचा समावेश होता. पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली महिला क्रीडापटू अवनी लेखारा, सुवर्णपदक विजेते प्रमोद भगत आणि कृष्णा नागर, रौप्यपदक जिंकणारा सुहास यथिराज, तसेच सिंहराज अधाना आणि मनीष नरवाल या सुवर्णपदक विजेत्या नेमबाजांसह अन्य खेळाडूंची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …