Breaking News

रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे सैनिकांचे सन्मान

रोहा  : प्रतिनिधी

रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे शहर व परिसरातील स्वातंत्र्यसैनिक व सीमेवर लढणार्‍या जवानांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला. त्यात मराठा बटालियनमध्ये श्रीनगर येथे कार्यरत असलेले व सध्या सूट्टीनिमित्त रोह्यात आलेले मिलिंद चाळके यांचाही समावेश आहे. त्यांनी यावेळी सीमेवरील कामाचे अनुभव विषद करुन रोटरी क्लबला विशेष धन्यवाद दिले. या वेळी रोटरी क्लबच्या महिला सदस्यांनी मिलिंद चाळके यांना राखी बांधून त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला.

रोह्यातील छत्रपती शिवाजी नगर येथील माजी सैनिक श्रीधर पैर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अनंतराव उर्फ आप्पा दाते, सतरा वर्षे लष्करात सेवा बजावणारे विश्वास बांदल यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश सरदार यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी सेक्रेटरी निखील दाते, खजिनदार मनोज बोराणा, मयुर दिवेकर, राकेश कागडा, दिपक सिंग, अशोक प्रजापती, डॉ. कैलाश जैन, सुचित पाटील, प्रदीप मेहेता, अजित तेलंगे, महेंद्र राठोड, महेंद्र खेरटकर, विकास जैन,  अ‍ॅड. पल्लवी दाते, शिवाली कागडा, रक्षा मेहेता, पिंकी प्रजापती, प्रतिक्षा जैन आदी रोटरी परिवारातील सदस्य उपस्थीत होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply