Breaking News

रायगडातही राष्ट्रवादीला गळती ; खारपाडा वडमाळवाडी येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

पेण : प्रतिनिधी

माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजप कार्यकर्ते हिरामण घरत व संजय घरत यांच्या विशेष प्रयत्नातून खारपाडा वडमाळवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज आपण विकासाच्या प्रवाहात सामील झाला आहात, असे सांगून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवण्याचे भारतीय जनता पक्षाचे असून उद्दिष्ट असून, त्यासाठी आम्ही सर्व जण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत, असे ना. चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

पेणमधील वैकुंठ निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, युवा कार्यकर्ता अमोल पाटील यांच्यासह बबन वाघे, धाऊ वाघे, दिलीप वाघे, शशिकांत वाघे, चरण वाघे, रविनाथ वाघे, अनिता वाघे, जयश्री वाघे, मीना वाघमारे, सुनीता पवार, राजेश पवार, जागृती जाधव, श्वेता जाधव, भाली जाधव, पोशी हिलम, रेश्मा हिलम आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, उपाध्यक्ष देवदत्त घरत, सरचिटणीस संजय घरत, चिटणीस हिरामण घरत, माजी सदस्य वैकुंठ पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष निशाकर घरत आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply