महाड : प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते व भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुमित पवार यांच्या मातोश्री स्मिता मोहन पवार यांचे बुधवारी (दि. 14) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी फौजी आंबावडे येथे जाऊन पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर कै. विश्वेश साठे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. या वेळी राजेय भोसले, बिपीन महामुणकर, जयवंत दळवी आदी उपस्थित होते.