Breaking News

किल्ले माणिकगडावर वृक्षारोपण; शिवकार्य ट्रेकर्सकडून पर्यावरण जागृतीचा संदेश

मोहोपाडा : प्रतिनिधी

पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी आणि किल्ले माणिकगडावर आलेल्या शिवभक्तांना सावलीसाठी किल्ले माणिकगडाच्या परिसरातील जंगलात वृक्षारोपण करण्यात आले. शिवकार्य ट्रेकर्स चौक-खालापूर वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्स ग्रुप गडकिल्यांवर जाऊन तेथील गडकिल्यांचे संवर्धन करीत असतो. याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवून इतरांच्या समोर आदर्श निर्माण करीत आला आहे. दिवसेंदिवस झाडांची होणारी हानी, जंगलात वनव्याच्या भक्ष्यस्थानी पडणारी झाडे हे सर्व लक्षात घेऊन खालापूर येथील शिवकार्य ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने किल्ले माणिकगडाच्या जंगलात वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, वनरक्षक प्रीती पाटील व वनपाल राजेश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.

उपक्रमात माणिकगडाच्या परिसरात जांभूळ, वड, शिसव व गुलमोहर आदी झाडे लावण्यात आली. उपक्रमात शिवकार्य ट्रेकर्स टीमने हातभार लावला आहे. या वेळी वृक्षारोपण करताना रोहिदास ठोंबरे, केतन भद्रीके, प्रसाद जाधव, रोशन ठोंबरे, अंकित पारठे, सचिन कडायत, ग्रामस्थ मंगल पारधी, जीवन पारधी, हरिश्चंद्र निरगुडा आदिंनी वृक्षारोपण करून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.

सध्याच्या घडीला जंगलात झाडे असणे ही काळाची गरज आहे. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाणीव ठेवून, आपण प्रत्येकाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढे

आले पाहिजे. -रोहिदास ठोंबरे, संस्थापक, शिवकार्य ट्रेकर्स ग्रुप, खालापूर

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply