Breaking News

खालापुरात भाजपचे संपर्क अभियान

खोपोली : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांना संपर्काद्वारे निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे काम सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून खालापूर-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 17) खरिवली पंचायत समितीच्या रानसई, शिरवली, गोरठण, वावोशी, परखंदे, जांभिवली, होराळे, आपटी, नंदनपाडा, अजिवली या गावातील बूथ कार्यकर्ता संवादाद्वारे संपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानाला भाजपच्या कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.

भाजप कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या नेतृत्वाखाली आजपासून खालापूर तालुक्यातील भाजपच्या बुथ कार्यकर्ता संवादाद्वारे संपर्क अभियानाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाची सुरुवात खरिवली पंचायत समितीच्या रानसई, शिरवली, गोरठण, वावोशी, परखंदे, जांभिवली, होराळे, आपटी, नंदनपाडा, अजिवली या गावातील भाजपच्या कार्यकर्त्यांना माजी आमदार देवेंद्र साटम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरील उत्साह आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळवून जाईल, असा विश्वास या वेळी साटम यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात साटम यांनी कार्यकर्त्यांचे निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम कोणते असते याबाबत महत्त्वाच्या टीप्स दिल्या. सोबत आगामी विधानसभा निवडणूक युतीच्या माध्यमातून लढविली जावी, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. आपणास युतीचेच काम करायचे आहे, मात्र युती असल्याने आपला पराभव कोणीच करू शकत नाही या भ्रमात कार्यकर्त्यांनी राहायचे नाही. आपण आपले काम प्रामाणिकपणे करायचे आहे.कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचून तो मतदार आपल्याला कसे मतदान करेल याकडे लक्ष देण्याचे आवाहन साटम यांनी आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांना केले. या वेळी त्यांच्या समवेत भाजपचे खालापूर तालुकाध्यक्ष मोरेश्वर उर्फ बापू घारे, शरद कदम, निवृत्ती पिंगळे, विठ्ठल मोरे, सनी यादव, रवींद्र मोरे, दिनेश घाडगे, मोहन घाडगे, वासुदेव धामनसे आदी अन्य मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply