

खारघर : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम खारघर येथे उत्सव हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध विनोदी कलाकार कमलाकर सातपुते, संतोष पवार, अलंक्रीत राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात रंग लावणीचे, महिलांसाठी खेळ पैठणीचा व सिनेकलाकारांसोबत दिलखुलास गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. खारघर येथील उत्सव हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार कमलाकर सातपुते, संतोष पवार, चिन्मय उद्गीरकर, भाग्यश्री लिमये अलंक्रीत राठोड यांच्यासोबत दिलखुलास गप्पा रंगल्या. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, खारघर भाजप अध्यक्ष बिजेश पटेल, तळोजा विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, अंबाभाई पटेल, नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्यय, आरती नवघरे, अनिता पाटील, महिला मोर्चा खारघर शहराध्यक्ष कुंदा मेंगडे, पनवेल शहर सरचिटणीस श्वेता खैरे, तालुका सरचिटणीस लीना पाटील, तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रतिभा भोईर, मंगलमूर्ती महिला मंडळाच्या महिला आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.