पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 29) पनवेल येथे जाहीर निषेध करण्यात आला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निषेध आंदोलनात यशश्रीला न्याय आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सहभागी होत दुष्कृत्याचा निषेध नोंदवला.
यशश्री शिंदे ही उरणधील तरुणी गुरुवारपासून बेपत्ता होती. दुसर्या दिवशी तिचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ मृतावस्थेत आढळला. यशश्रीच्या शरीरावर वार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची बाब तपासादरम्यान समोर आली तसेच यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असून घटनेच्या निषेधार्थ पनवेलमधील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ महिला मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यशश्रीला न्याय देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, सरचिटणीस चारुशीला घरत, अॅड. संध्या शारबिद्रे, अॅड. वृषाली वाघमारे, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, सुशीला घरत, रूचिता लोंढे तसेच सपना पाटील, यमुना प्रकाशन, ज्योती देशमाने, मनिषा चिले, भाजप जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, अमित ओझे, चंद्रकांत मंजुळे, केदार भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, सतिष पाटील, कामगार नेते रवी नाईक यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …