नवी दिल्ली : भारतीय मिग-21 लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणार्या आणि टॉर्चर करणार्या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते, तसेच त्या वेळी त्याला एका पाकिस्तानी कमांडोने मारहाणही केली होती. सुभेदार अहमद खान असे या पाकिस्तानी कमांडोचे नाव आहे. तो पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कार्यरत होता. भारताच्या गोळीबारात त्याचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …