नवी मुंबई : प्रतिनिधी
आयुर्वेदातील वनस्पती व प्राणीज घटकांबरोबरच सुवर्ण, रौप्य आदी विविध धातू व पारदसारख्या अन्य खनिज घटकांचा रोगनिवारणासाठी औषध म्हणून कशा पद्धतीने वापर करावा याचे मार्गदर्शन करणारे औषधी निर्माणाचे शास्त्र म्हणजे रसशास्त्र. रसशास्त्रातील औषधांची निर्मिती हे श्रीधूतपापेश्वर लिमिटेडचे खास वैशिष्ट्य. 145 वर्षांहून अधिक काळ श्री धूतपापेश्वर लिमिटेडद्वारा विविध प्रकारच्या रसऔषधांची निर्मिती केली जात आहे. या रसऔषधांची निर्मिती, मानकीकरण, सुरक्षितता आदी विषयांवरील माहितीसाठी एक दिवसाचा परिसंवाद आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच वैद्यांसाठी शनिवारी (दि. 24) सकाळी 9 ते सायंकाळ 5 पर्यंत ‘आयुष एक्स्पो 2019 व आरोग्य’मध्ये आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादमध्ये रसशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या औषधी निर्माणपद्धतींविषयी माहिती तज्ज्ञांद्वारा देण्यात येणार आहे.
मान्यवर रसशास्त्रतज्ज्ञ डॉ. गोपीकृष्ण मेट्टीकेरा आणि डॉ. संजीव गोडा पाटील यांचे रसशास्त्राची प्रभावी औषधी कल्पना ‘पोट्टली रसायन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. वैद्य सावरीकर, वैद्य शैलेश नाडकर्णी आणि डॉ. आर. व्ही. गुडी या मान्यवरांकडून ‘मेटल्स इन आयुर्वेद – बेनऔर बून’ या विषयावर संभाषण होणार आहे. डॉ. आर. व्ही. गुडी ‘कुपीपक्व रसायन निर्माण विधी’ आणि वैद्य तुषार घाग ‘पर्पटी निर्माण विधी’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. नीलेश गवस ‘खनिज द्रव्यांचे शोधन’ आणि डॉ. के. एस. ठाकूर ‘श्रीधूतपापेश्वर स्टॅर्न्डस क्वॉलिटी’, डॉ. मुकेश चावडा ‘सुरक्षितता आणि उपयुक्तता’ यांचे व्याख्यान, तसेच डॉ. जयेश बेलारे यांचे ‘रसौषधींची सुरक्षितता’ या विषयावर द़ृक्श्राव्य माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. वैद्य शैलेश नाडकर्णी हे विशेषतः सुवर्णकल्प व अन्य रसकल्पांच्या उपयोगितेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाबद्दलची माहिती आपल्याला ुुु.ीवश्रळपवळर.लेा या वेबसाइटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सोनाली कोकाटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.