Breaking News

कविता आणि कथालेखन स्पर्धेचे आयोजन

नवी मुंबई  : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई साहित्य परिषदेचे पाचवे साहित्य संमेलन दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे. यानिमित्ताने नवोदित  साहित्यिकांना संधी मिळावी या हेतूने कविता आणि कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कविता स्पर्धेकरिता स्त्री भावनांचे दर्शन घडविणार्‍या कविता असाव्यात. कविता 16 ते 20 ओळींच्या असाव्यात. आलेल्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. याकरिता स्पर्धकांनी आपल्या दोन कविता सशुल्क पुढील पत्त्यावर पाठवाव्यात. कविता निवडण्याचा अंतिम निर्णय आयोजकांचा असेल. ज्या कवितांची निवड होणार नाही त्या कवितांसाठीचे शुल्क संबंधितांना परत करण्यात येईल. कथा स्पर्धेकरिता विषयाचे बंधन नाही. तरीही एकत्र कुटुंबपद्धतीकडे झुकणारी समाजाची मानसिकता, स्त्रियांच्या भावना, समस्या, स्त्री-भ्रूणहत्या असे काही विषय अपेक्षित आहेत. कथेसाठी शब्द मर्यादा बाराशे ते पंधराशे असून, कथा शक्यतो टंकलिखित अथवा सुवाच्च्य अक्षरात, तसेच दोन्ही बाजूला समास सोडून पाठपोठ न लिहिलेली असावी. आपल्या कथा 10 सप्टेंबरपर्यंत ाीमवहर्रींरश्रळज्ञरीऽूरहेे.ले.ळप या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी  ऋतुजा गवस 8652433223,  कल्पना देशमुख 8169505369 किंवा मोहन ढवळीकर 9223227965 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई साहित्य परिषदेने केले आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply