उरण : वार्ताहर
नगरपालिकेच्या विमला तलावाजवळील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथील युफोरिया हेल्थ अॅण्ड फिटनेस क्लबचे नुकतेच जेएनपीटी विश्वस्त तथा रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या वेळी उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगरसेविका प्रियंका पाटील, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेविका दमयंती म्हात्रे, नगरसेविका जान्हवी पंडित, भाजप कार्यकर्ते मनोहर सहतीया, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, युफोरिया हेल्थ अॅण्ड फिटनेस क्लबच्या प्रोप्रायटर विदुला रवींद्र कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
उरणमधील सर्व नागरिकांनी निरोगी व फिट राहावे यासाठी मुखत्वे क्लब सुरू केला आहे. वजनानुसार व्यायाम व आहारात बदल करून दिला जातो, आरोग्य चांगले राहवे याविषयी चांगले मार्गदर्शन केले जाते, असे युफोरिया हेल्थ अॅण्ड फिटनेस क्लबच्या प्रोप्रायटर विदुला रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.