Breaking News

खालापूरजवळ गॅस टँकर पलटी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई -पूणे महामार्गावरुन चाललेला एलपीजी गॅसने भरलेला टँकर खालापूरजवळ माधवबाग येथे पलटी झाल्याची घटना बुधवारी (दि. 21) दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातातून चालक सोमनाथ व्यकंट कांदे सुखरूप बचावला आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एचपी कंपनीचा भरलेला गॅस टँकर पनवेलहून खोपोलीच्या दिशेने जात असताना माधवबागनजीक उतारावर चालक सोमनाथ याचे नियंत्रण सुटले. आणि अनियंत्रित झालेला टँकर रस्त्यानजीक असलेले झाड तोङून खड्ड्यात पलटी झाला. माधवबागमधील डॉक्टर प्रमोद  व कर्मचारी तातडीने घटनास्थळी मदतीसाठी धावले. मात्र टँकर गॅसने पूर्णपणे भरलेला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खालापूर पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती देण्यात आली. पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे यांनी तातडीने खोपोली येथील अग्निशामक दलाला पाचारण करत वाहतुक पोलीस घटनास्थळी पाठवले. अपघातून बचावलेल्या चालक सोमनाथ याने तातडीने बॅटरी जोडणी वेगळी केल्यामुळे तसेच गॅस गळती नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply