Tuesday , February 7 2023

आता कर्जतमध्ये रिव्हर राफ्टिंगचा थरार

कर्जत : विजय मांडे
कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटनेच्या सहाय्याने कर्जत येथील पेज नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार सुरू झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवला आणि सर्व सदस्यांनी प्रथम रिव्हर राफ्टिंग केले.
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कर्जतची भुरळ नेहमीच पर्यटकांना पडते. एक-दोन दिवस प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवून ताजेतवाने होण्यासाठी अनेक पर्यटक कर्जतला येत असतात. स्थानिक तरुणांनी पर्यटन व्यवसायात प्रगती केली आहे. तालुक्यात येणार्‍या पर्यटकांना उत्तम प्रतीचे जेवण मिळावे, सुटीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी सर्वच सुविधा आपल्या रिसॉर्टवर उपलब्ध करून देण्याचा येथील तरुणाई सातत्याने प्रयत्न करीत आहे. येथे आलेल्या पर्यटकांची उत्तम सोय करून त्यांना फ्रेश करण्याचा प्रयत्न भूमिपुत्र करीत आहेत.
कर्जत रिव्हर राफ्टिंगच्या माध्यमांतून पेज नदीवर चालू झालेला पाच किमी अंतराचा नागमोडी वळणाने पाण्याचे तुषार अंगावर घेत चित्तवेधक थरार अनेक पर्यटकांना आकर्षित करील आणि त्या माध्यमांतून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, असा विश्वास कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी व्यक्त केला.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply