नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वन डे आणि टी-20 मालिकेनंतर काही दिवसांची उसंत मिळाल्याने भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजमधील निसर्गसौंदर्य भरपूर एन्जॉय करताना दिसत आहे. शिखर धवनसह काही खेळाडूंचे पोहतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता कर्णधार विराट कोहलीचा पत्नीसोबतचा बीचवरील खास ’लूक’ सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकला आहे.
खुद्द विराट कोहलीनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा बीचवरील फोटो पोस्ट केला आहे. समोर निळाशार विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे आणि विराट पत्नीसोबत निवांत क्षण घालवतोय असा हा फोटो आहे. या हटके फोटोखाली विराटने कोणताही मजकूर लिहिला नाही, मात्र प्रेम व्यक्त करणारे तीन इमोजी टाकले आहेत. हा फोटो पोस्ट केल्यानंतर एका तासात तब्बल 19 लाख लोकांनी फोटो लाइक केला. तीन तासांनंतर हा आकडा 25 लाखांवर पोहचला. के. एल. राहुलनेही हा फोटो लाइक केला आहे.