Breaking News

भारतीय खेळाडूंचा वायुसेनेला सलाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईचे देशभरातून कौतुक होते आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनीही भारतीय हवाई दलाला सलाम केला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आम्ही (भारतीय) चांगले वागतो म्हणून आम्हाला कमकुवत समजू नका, असा इशारा ट्विट करून दिला आहे, तसेच त्याने भारतीय वायुसेनेला सलाम आणि जय हिंद असेही लिहिले आहे.

सेहवागनेही ट्विट करून वायुसेनेचे कौतुक केले होते. ‘द बॉईज हॅव प्लेड व्हेरी वेल’ या वाक्यावरून अनेकदा पाकिस्तानचे क्रिकेटपटू ट्रोल झाले आहेत. हेच वाक्य वापरून भारतीय वायुदलाच्या कामगिरीचे सेहवागने आपल्या खास शैलीत कौतुक केले. त्याचप्रमाणे ‘सुधर जाओ वरना सुधार देंगे’ हा हॅशटॅगशी सेहवागने ट्विट केला आहे.

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने,  भारतीय हवाई दलाला सलाम, शानदार… असे ट्विट केले आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चहल म्हणाला की, इंडियन एअर फोर्स बहोत हार्ड!

भारताची फुलराणी सायना नेहवालने वायुसेनेला त्रिवार सलाम ठोकला आहे. किदम्बी श्रीकांतनेही ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये श्रीकांतने, कामगिरीबाबत वायुसेनेला सलाम करीत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असे म्हटले आहे. टेनिसपटू महेश भूपती, हरभजन सिंग आदी खेळाडूंनीदेखील भारतीय वायुसेनेला कुर्निसात केला आहे.

काश्मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. यात भारताचे सुमारे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली. भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हजार किलोचे बॉम्ब फेकले आणि तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायुसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या हल्ल्यात सुमारे 350 दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply