Breaking News

नवीन पनवेलमध्ये एआय एक्सपेरिमेंटल लॅब सुरू

आधुनिक तंत्रज्ञानाची होणार ओळख

पनवेल : रामप्रहर वृत्त
आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध घेत नेहमीच विविध कोर्सेस आणि त्या अनुषंगाने प्रयोग करणार्‍या आणि संगणक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या ’शाहू इन्स्टिट्यूट ऑफ
इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी’ या संस्थेचा रौप्य महोत्सव माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 10) नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात झाला.
या वेळी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली असलेल्या ’एआय एक्सपेरिमेंटल लॅब’चे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या लॅबमुळे आता विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार असून शिक्षण क्षेत्रातील आणखी एक पर्वणी मिळाली आहे. काळानुसार होणार्‍या बदलाची योग्य वेळी चाहूल लागून संगणकाचे ज्ञान घराघरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सी-डॅकचे तत्कालीन प्रमुख विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 ऑगस्ट 1999 रोजी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची जयंत भगत यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली आणि या संस्थेला अल्पावधीतच मोठे यश मिळाले.
काळानुसार विविध कोर्सेस या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले. संस्थेला 25 वर्षे होत असताना विद्यमान पिढीची शैक्षणिक दृष्ट्या आवश्यकता लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ’एआय एक्सपेरिमेंटल लॅब’ उभारण्यात आली आहे.
या कार्यक्रमास एमकेसीएलच्या संचालक विना कामथ, वरिष्ठ व्यवस्थापक अतुल पतौडी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी सदस्य संजय भगत, कामोठे भाजपचे अध्यक्ष रवी जोशी यांच्यासह विविध सेंटरचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांचे शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्रमुख जयंत भगत यांनी सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply