खोपोली : प्रतिनिधी
पूरग्रस्तांसाठी सहाय्यता निधी म्हणून खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने जनकल्याण समितीला 12 हजार 251 रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी हर्डीकर, उपाध्यक्षा सुनीता पाटणकर, कार्यवाह अनिल रानडे, सहकार्यवाह वृषाली बेलसरे, खजिनदार सुधाकर भट, खजिनदार अंबादास पाठक, अपर्णा साठे, शशिकांत पाटणकर, रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, संघाचे तालुका संघचालक राकेशजी पाठक, रोहित कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.