Breaking News

विचित्र अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेलजवळील मुंबई-गोवा

महामार्गावरील कर्नाळा अभयारण्याकडे जाणार्‍या भरधाव टँकरने अल्टो गाडीला पाठीमागून धडक दिल्याने तसेच त्यानंतर दुसर्‍या इनोव्हा कारलाही धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एक ठार, तर गाडीतील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदर टँकर कर्नाळा अभयारण्याकडे जात असताना टँकरने अल्टो कारला पाठीमागून धडक दिली. त्याचप्रमाणे फिर्यादी शेखर भोसले यांच्या इनोव्हा कारलाही धडक दिली. या अपघातात गाडीतील 16 वर्षीय मुलगी समिक्षा भोसले आणि चार वर्षीय सोनिका माने जखमी झाले, तर अल्टो गाडीचा चालक रज्जब ममतुले गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

पनवेल पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल, वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. यानंतर घटनास्थळी क्रेन बोलावून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply