Breaking News

पनवेल तालुक्यात 429 रुग्णांचा नवा उच्चांक

आठ जणांचा मृत्यू    333 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शनिवारी (दि.12) कोरोनाचे 429 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 291 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 227 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 138 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला तर 106 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 11 गुरुद्वारा जवळ, सेक्टर 1 ई सत्यसंस्कार सोसायटी, सेक्टर 13 संगम सोसायटी, खांदा कॉलनी सेक्टर 7 निळकंठज्योत, खारघर सेक्टर 20 श्री टावर आणि कामोठे सेक्टर 8 बालाजी निवास येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2474 झाली आहे. कामोठेमध्ये 60 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3192 झाली आहे. खारघरमध्ये 81 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2991 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 58 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2740 झाली आहे. पनवेलमध्ये 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2614 झाली आहे. तळोजामध्ये सहा नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 678 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 14689 रुग्ण झाले असून 12244 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.65 टक्के आहे. 2106 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 339 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 38, सुकापूर 21, करंजाडे 15, विचुंबे सहा, आदई, पळस्पे प्रत्येकी पाच, उसर्ली चार, आकुर्ली, नेरे, शेलघर प्रत्येकी तीन, गव्हाण, कोन, कुंडेवहाळ, कानपोली, कोळखे, कोप्रोली, पालेबुद्रुक, तारा-बारापाडा येथे प्रत्येकी दोन, आजीवली, देवद, केळवणे, मोरावे, नांदगाव, न्हावा, वाजे, बामणडोंगरी, बंबावीपाडा, बोनशेत, चिपळे, कासारभाट, मालेवाडी-सुकापूर, रिटघर, सांगडे, शिरढोण, वहाळ, विहीघर, वावेघर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर आकूर्ली आणि गव्हाण येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 4637 झाली असून 3722 जणांनी कोरोनावर मात केली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 28 नवे रुग्ण

उरण : उरण तालुक्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह 28 रुग्ण आढळले व चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये नागाव पाच, बोकडवीरा दोन, मोरा कोळीवाडा, आवरे, सीआयएसएफ ओएनजिसी कॉलनी, साई नगर बोरी, करंजा, फुंडे, नवापाडा करंजा, भेंडखळ, नवीनशेवा, कोटनाका, करंजा रोड, कोळीवाडा, द्रोणागिरी, मुळेखंड तेलीपाडा, द्रोणागिरी, जेएनपीटी टाऊनशिप, उरण, देऊळवाडी, धुतुम, चीर्ले, कोप्रोली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.     

कर्जतमध्ये 23 नवे पॉझिटिव्ह

कर्जत : कर्जत तालुक्यात शनिवारी 23 कोरोना बाधितांची भर पडल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 1196 वर गेली आहे. तर 923 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. दिवसभरात दोन रुग्ण दगावले असल्याने मृतांची संख्या 50 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांत महावीर पेठ, कशेळे, बेकरे प्रत्येकी दोन, धापया मंदिर नजीक, मुद्रे खुर्द नानामास्तर नगर, शहरातील सिप्रा, दहिवली, मातोश्री हॉस्पिटल नजीक, दहिवली तर्फ वरेडी, कर्जत शहर, माथेरान, नेरळ, कुशिवली, नेवळी, मुळगाव, चिंचवली, सावरगाव, कडाव, खांडस, गुढवण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply