पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. संदीप विलासराव घोडके यांना भारत सरकारच्या यूजीसी व नॅक यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार बेंगलोरस्थित आयआयएसईआरमार्फत भव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. संदीप विलासराव घोडके हे गेली 25 वर्षे सिनिअर कॉलेज व पद्व्युत्तर स्तरावर रयत शिक्षण संस्थेत पंढरपूर, राजापूर, पाचवड, हडपसर, पनवेल, फुंडे व मंचर महाविद्यालयात शिवाजी, पुणे व मुंबई विद्यापीठअंतर्गत राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून सेवेत आहेत. डॉ. घोडके यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांतठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाणसाहेब कराळे, सुधीरभाऊ घरत व रयत सेवक आदींनी अभिनंदन केले आहे.