Breaking News

गुळसुंदे येथे उद्या मराठा समाजाचा सत्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रसायनी पातळगंगा विभाग श्री नाईक मराठा समाज व सकल मराठा यांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्यातील लढवय्ये शिलेदारांचा जाहीर सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम रविवारी (दि. 25) शंकर मंदिर गुळसुंदे येथे होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महादेव कचरे, सेक्रेटरी राजेंद्र दसवंते यांनी दिली. दि. 29 नोव्हेंर रोजी विधीमंडळात मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले. यासाठी 58 मूकमोर्चे काढावे लागले. शिवाय 42 जणांनी बलिदान दिले. रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणारे विनोद साबळे व त्यांचे सहकारी यांचा गौरव व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. समाजाच्या आरक्षणासाठी झगडणारे लढवय्ये, समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply