
शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात फस्ट कराटे फीस्ट चॅम्पियनशिप पनवेल 2019 ही स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी प्रेसिडेंट अतुल बोरा, सेक्रेटरी शैलेश जाधव, अतुल पोतदार, संजय गव्हाळे यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते.