



नवीन पनवेल ः पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष असलेल्या तेजस कांडपिळे यांच्या साईतेज प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रंगला. या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेता अंकुश चौधरी याची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.