Breaking News

पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने ‘माय इकोफ्रेंडली बाप्पा’ या शीर्षकाखाली पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.

हल्ली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे भाविकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीतील श्रीगणेश मंदिर सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख 29 ऑगस्ट आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी मयुरेश नेतकर (9821531547), चिन्मय समेळ (8767149203) किंवा अभिषेक पटवर्धन (9029580343) यांच्याशी संपर्क साधावा आणि कार्यशाळेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

घरगुती गणेश सजावट स्पर्धा

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने घरगुती पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 25 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून, ही स्पर्धा प्रभाग क्रमांक 19करिता मर्यादित आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख 30 ऑगस्ट असून, नावनोंदणी व अधिक माहितीसाठी रिलहरस19लक्षिऽसारळश्र.लेा, मयुरेश नेतकर (9821531547), चिन्मय समेळ (8767149203) किंवा अभिषेक पटवर्धन (9029580343) यांच्याशी संपर्क साधावा.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply