
कोन (ता. पनवेल) : कोविड-19 विषयात तातडीने पावले उचलून त्याला अटकाव करावा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया बुल्स येथे तहसीलदारांना दिले. या वेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते.