Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘कठोर परिश्रम करून राष्ट्र घडवण्याच्या कामात आपले योगदान देणार्‍या शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या शिक्षकांच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे तसेच माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. एस राधाकृष्णन यांना त्यांनी जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.  
पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, मी आपल्या परिश्रमी शिक्षकांप्रती कृतज्ञ आहे. या दिवशी मी आपल्या शिक्षकांच्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानतो. दुसर्‍या एका ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये शिक्षकांबद्दल केलेल्या चर्चेचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, शिक्षकांनी आपल्या गौरवपूर्ण इतिहासाबद्दल मुलांना अवगत करून दिले आहे. मी शिक्षकांना एक कल्पना सूचवली होती की त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल कमी ज्ञात असणार्‍या गोष्टी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply