Breaking News

दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानाला अरुण जेटलींचे नाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) ने फिरोज शाह कोटला स्टेडिअमचे नामांतर केले आहे. दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांच्या सन्मानात या मैदानाचे नाव त्यांच्या नावे करण्यात आले आहे. जेटलींचे शनिवारी एम्स रुग्णालयात निधन झाले. क्रिकेटविषयी त्यांची विशेष आवड लक्षात घेता स्टेडिअमला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, एकेकाळी जेटलींनी डीडीसीएचे अध्यक्ष पद सुद्धा भूषविले होते. आता मैदानच त्यांच्या नावे ओळखले जाणार आहे.

या स्टेडिअमच्या नामांतरासाठी विशेष कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाव येथील एका स्टँडला देण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा आधीच करण्यात आली होती. त्याचीच औपचारिक अंमलबजावणी कार्यक्रमातून केली जाणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडा मंत्री किरण रिजीजू देखील सहभागी होणार आहेत.

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, अरुण जेटली यांच्या सहकार्य आणि प्रोत्साहनातून विराट कोहली, वीरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, आशीष नेहरा, ऋषभ पंतसह अनेक खेळाडू देशासाठी खेळले. ते पुढे जाऊन देशाला आणखी प्रतिष्ठा मिळवून देतील. जेटली जेव्हा अध्यक्ष होते, तेव्हा स्टेडिअमचे आधुनिकीकरण करण्यात आले होते. प्रेक्षकांची क्षमता वाढवण्यात आली होती. त्यांनी जागतिक स्तराचे ड्रेसिंग रूम सुद्धा बनवले होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply