Breaking News

भाजप नेते संजय घरत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष संजय घरत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 15) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना युनिवर्सल स्मार्ट कार्ड आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन संजय घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खारघरचे माजी सरपंच आणि भाजपचे खारघर तळोजा मंडळाचे उपाध्यक्ष संजय घरत यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि कोरोना लसीकरण पुर्ण केलेल्या 80 नागरिकांना युनिवर्सल स्मार्ट कार्डचे वाटप सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. खारघर सेक्टर 4 येथील जनसंवाद कार्यालयात झालेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, युवा नेते समीर कदम, नवनीत मारु, संयोजक सस्मित डोळस, आशिष भोईर, अक्षय पाटील, यतीन बारशे,  अजय भोईर, दर्शन भोईर, कल्पेश म्हात्रे, मयूर बारशे, राहुल पाटील, मनोज भोईर, राहुल, महेश भोईर, रुतिक म्हात्रे, रोहन भोईर, समीर डांगरकर, गजानन इंदुलकर, दत्ता कांबडी, रवी कांबडी, संवाद महिला मंचाच्या सिद्धी घरत, कावेरी डोळस, धनश्री भोईर, वैष्णवी बारशे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी संजय घरत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply