उरण ः प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (67) यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची शोकसभा स्व. अनंत तरे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झाली.
या वेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, खासदार राजन विचारे, भाजपचे आमदार कोळी समाजाचे नेते रमेश पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आगरी समाजाचे नेते दशरथ पाटील, राजाराम पाटील, पत्रकार कैलास म्हापदी, समाजसेवक नानजी खिमजी ठक्कर ठाणावाला, उद्योजक नंदकुमार साळवी, दिगंबर सुखी, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विलास कुटे, मारुती देशमुख, नगरसेवक नजीब मुल्ला, गायक हर्षला पाटील, शाहीर अर्जुन अटाळीकर, रमेश नाखवा, मनसेचे विश्वजित जाधव, भाजपचे विक्रांत भोईर, राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे मधुकर वैती, प्रकाश वैती, दता वैती, ठाणे महापालिका शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्वातंत्र्यसेनानी सुरेश ठाणेकर, माजी नगराध्यक्ष संपदा जोगळेकर, ठाणे जिल्हा कोळी समाजाचे युवा नेते परेश कांती कोळी, कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील, डी. एम. कोळी, जयेंद्र खुणे, देवानंद भोईर, माजी नगरसेवक कृष्ण कुमार कोळी, दत्ता भोईर (उरण), के. एल. कोळी (मा. चेअरमन करंजा सोसायटी) आदी उपस्थित होते.