रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील बेलाशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली गावातील द्वारकाधीश मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. माजी उपसरपंच संतोष निगडे यांच्या हस्ते या रस्त्याचे रविवारी (दि. 25) सकाळी लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण स्वखर्चाने केले आहे. या वेळी नंदकुमार पाटील, बेलोशी हायस्कूलचे माजी चेअरमन दत्तात्रेय भोपी, महेश चवरकर, बळीराम पाटील, दिगंबर पाटील, अनंता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.