Breaking News

तंदुरुस्त भारत अभियानात चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य, विज्ञान  महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय क्रीडादिनी केलेल्या तंदुरुस्त  भारत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.

देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी व इतर विद्यार्थ्यांनी तंदुरुस्त राहण्याची शपथ घेतली. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी राष्ट्रीय क्रीडादिन व तंदुरुस्त भारत अभियानाचे महत्त्व विशद केले तसेच भारताच्या वेगवेगळ्या मैदानी खेळांचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी परिश्रम घेतले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply