Breaking News

जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ‘मिशन मंगल’

खारघर : प्रतिनिधी

युवा प्रेरणा सामाजिक संस्थेतर्फे खारघरमधील मुर्बी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. 29) ‘मिशन मंगळ’ हा प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यात आला. युवा प्रेरणा सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून खारघरमध्ये अनेकविध सामाजिक उपक्रम राबवते. देहदान, अवयवदान, रक्तदान, शैक्षणिक, आरोग्यविषक याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक जाणिवा नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते.

खारघरमधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम या वेळी राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या 30 ते 40 विद्यार्थ्यांनी हा चित्रपट खारघर येथील लिटल वर्ल्डमधील कार्निवल सिनेमागृहात पाहिला. विशेष म्हणजे यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच चित्रपटगृहात प्रवेश केल्याने त्यांच्यामध्ये आनंदनाचे वातावरण होते. भारताची मिशन मंगळ ही मोहीम प्रत्येक भारतीयांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. पहिल्याच वेळेला अशाप्रकारे देशभक्तीपर प्रेरणादायी चित्रपट या विद्यार्थ्यांनी पाहिल्याने विद्यार्थ्यांचा जीवनात त्याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे आणि नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचे विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनापासून आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply