नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
दिनांक 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात 1872 पासून शास्त्रोक्त, मानकीकृत सुरक्षित आणि उपयुक्त औषध निर्माण करणार्या श्री धूतपापेश्वर लिमिटेडने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
आयुर्वेदाशी संबंधित सर्व पुढाकारांना तसेच जनसेवेशी संबंधित कार्यात मदत करण्यासाठी श्री धूतपापेश्वर लिमिटेड सुरुवातीपासून अग्रेसर राहिली आहे. त्याच परंपरेला पुढे चालवत श्री धूतपापेश्वर लिमिटेडने प्रदर्शनास भेट देणार्या सामान्य लोकांसाठी ‘बोन मिनरल डेंसिटी’ व ‘सुवर्णप्राशन’ अशी दोन शिबिरे आयोजित केली होती. येथे शेकडो रुग्णांची तपासणी करून समुपदेशन व औषध सल्ला देण्यात आला. मिनिस्ट्री ऑफ आयुषचे सल्लागार डॉ. दिनेश कटोच, डॉ. मनोज नेसरी, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊ ळ, नॅशनल इस्टिस्टय्युट ऑफ आयुर्वेदचे डॉ. पवनकुमार गोदतवार, डॉ. आर. एस. जयवर्धने यांच्यासह अन्य मान्यवरांनी या आरोग्य शिबिरांना भेट देऊ न कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. या शिबिरांमध्ये जमा झालेले पैसे महाराष्ट्रातील पूरप्रभावित क्षेत्रातील पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहेत.