मोहोपाडा : वार्ताहर
रसायनी वाशिवली येथील डॉ. ए. आर. पाटील यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत आपले जीवन सेवेसाठी राबविण्यात येणार्या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन महाप्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ए. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण आरएसपी, पोलीस व शिक्षण विभागाने एकदिवसीय कार्यशाळा सुधागड शाळा कळंबोली येथे आयोजित केली होती. या वेळी महालक्ष्मी रेल्वेतील पूरग्रस्त नागरिकांना मदत केलेल्या बदलापूर विभागीय आरएसपी अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महासमादेशक अरविंद देशमुख, गटशिक्षणाधिकारी साबळे साहेब, नवी मुंबई समादेशक व कार्यक्रमाचे आयोजक विलास पाटील, कार्याध्यक्ष इनामदार, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, अॅड. के. डी. पाटील व नवी मुंबईतील वाहतूक पोलीस कर्मचारी व रायगड, ठाणे, मुंबई जिल्ह्यातील अनेक शाळांमधील रस्ता सुरक्षा शिक्षक अधिकारी उपस्थित होते.
या वेळी पोलीस उपायुक्त यांनी कमी कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान, नागरी संरक्षण दल, गणपती विसर्जन, बंदोबस्त, अपघात रोखण्यासाठी पोलिसांना विद्यार्थी व शिक्षक मदत करतात म्हणून सर्वांचे अभिनंदन केले, कार्यक्रमाचे नियोजन नवी मुंबईचे समादेशक विलास पाटील व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी उत्कृष्ट केले म्हणून त्यांचे आभार मानले.