पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात ट्रान्सफॉर्म पनवेल 2019 या कार्यक्रमाचे 29 व 30 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवारी आंतर महाविद्यालयीन रिर्सच पेपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून ट्रॉन्सफॉर्म पनवेल 2019 हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असतो. हा कार्यक्रम 29 व 30 ऑगस्ट दरम्यान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध विषयांवरील रिर्सच पेपरचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डॉ. गिरीश गुणे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, युवामोर्चा शहरअध्यक्ष चिन्मय समेळ, डॉ. नितीन परभ, शुभलक्ष्मी आचार्य, प्रशांत रसाळ उपस्थित होते.