Breaking News

उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार असून पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सातत्याने शासनाकडे तसेच वीजवितरण कंपनीच्या संबंधीत अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून शहरासाठी नवीन अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित सबस्टेशन उभारावे, अशी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण होताना दिसून येत आहे.

पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणार्‍या वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यावर उपाय म्हणून टपाल नाका येथे अद्यवत तंत्रज्ञानावर आधारित सबस्टेशन तयार केले जात आहे. या नवीन सबस्टेशनमुळे भिंगारीवरून पनवेलला होणार्‍या विद्युत पुरवठ्यामधील तांत्रिक अडचणी व त्यामुळे उद्भवणार्‍या समस्या थांबणार आहेत व थेट या नवीन सबस्टेशनवरून शहराला स्वतंत्र विद्युत पुरवठा होणार आहे, शहरातील आठ प्रमुख भागांसाठी आठ स्वतंत्र  लाईन्स कार्यान्वित होणार आहेत, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्यांवर तोडगा निघणार आहे. या विषयासाठी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून सध्या सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  शुक्रवारी (दि.30) त्यांनी या कामकाजाची पाहणी उपअभियंता जयदीप नानोटे, कनिष्ठ अभियंता मोरे, महाडिक, लडे यांच्यासोबत केली. अधिकार्‍यांशी चर्चा करून आवश्यकता सूचनासुद्धा त्यांनी या वेळी केल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply