पनवेल : वार्ताहर
तळोजात कुटुंबासह आत्महत्या करणारे नितीश उपाध्याय यांनी घरात दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट्स लिहून ठेवल्या होत्या, तसेच त्यांनी व्हॉट्सअॅप डिपीवर मृत्यूशी संवाद साधत असल्याचा फोटो ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी तळोजा फेज 1मधील शिवकॉर्नर सोसायटीत भाडेतत्त्वावर राहणार्या उपाध्याय कुटुंबीयांनी आर्थिक संकटातून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतांमध्ये नितीश उपाध्याय, त्यांची पत्नी बबली, मुलगी नव्याकुमारी व मुलगा ओमकुमार यांचा समावेश आहे. मयत नितीश उपाध्याय यांचा भाऊ दिल्ली येथे वास्तव्यास असून त्याच्याशी तळोजा पोलिसांनी संपर्क साधून त्याला तळोजा येथे बोलाविले आहे. तो आल्यावरच या घटनेचा काही अंशी उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.