Breaking News

वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे पेटत्या गाडीतील व्यक्ती बचावला

पनवेल : वार्ताहर

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून जात असलेल्या एका गाडीमध्ये स्पार्किंग होऊन अचानकपणे गाडीने पेट घेतला. त्यावेळी तेथे कार्यरत असलेले वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे गाडीतील व्यक्तीचा जीव बचावला आहे.

वाहतुक पोलीस तळोजा परिसरात नो पार्कींगचे कारवाई करीत असताना तळोजा एमआयडीसी रोडवर पडघाफाटा येथे अचानक टीयुव्ही कार (एमएच 46 एपी 3332) या कारला पुढील बाजुस अचानक स्पार्किंग होऊन कारला आग लागल्याने पेट घेतला. या ठिकाणी तळोजा वाहतुक शाखेतील हवालदार चंद्रशेखर वाघ व नाईक ललित शिरसाठ यांनी प्रथमतः कारमधील अडकलेल्या व्यक्तीस सुरक्षितरित्या बाहेर काढले. प्रसंगाचे भान राखत रस्त्याने जात असलेला पाण्याचा टँकर अडवून वाघ व शिरसाठ यांनी कारला लागलेली आग विझवली. तसेच आग विझविण्याचे काम सुरू असताना शिपाई बिराजदार व काचरे यांनी नागरिकांची सुरक्षा सांभाळून वाहतुकीचे नियमन केले. जमलेल्या  नागरिकांनी  वाहतुक पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply