Breaking News

भोगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात यंदापासून सार्वजनिक गणेशोत्सव

पोलादपूर : प्रतिनिधी

पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 2 ते 7 सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, 4 सप्टेंबर रोजी भाजप जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता एक कोटी 31 लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच राकेश उतेकर आणि उपसरपंच दगडू कदम यांनी येथे दिली.

श्रीगणेशाची सवाद्य मिरवणूक व स्थापना 2 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रंगतील. 4 तारखेला होणार्‍या सोहळ्यात भोगाव बुद्रुक पार्टेवाडी साठवण टाकी (12 लाख), भोगाव बुद्रुक येलंगेवाडी साठवण टाकी (15 लाख) व भोगाव खुर्द दत्तवाडी अंतर्गत रस्ता टप्पा 1 हे (दोन लाख) या 29 लाखांच्या कामांचे उद्घाटन, तर भोगाव बुद्रुक स्मशानभूमी, पार्टे वाडी भोगाव बुद्रुक स्मशानभूमी, येलंगेवाडी भोगाव बुद्रुक अंतर्गत रस्ता, दत्तवाडी भोगाव खुर्द अंतर्गत रस्ता टप्पा, येलंगेवाडी भोगाव बुद्रुक स्मशानभूमी, साईनगर भोगाव खुर्द अंतर्गत रस्ता, भोगाव बुद्रुक अंतर्गत रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण, भोगाव बुद्रुक अंतर्गत रस्ता, भोगाव खुर्द गावठाण अंतर्गत रस्ता, ग्रामदैवत मंदिर रस्ता, हायमास्ट लाईट पोल, भोगाव खुर्द दत्तवाडी नवीन विहीर, भोगाव खुर्द नळपाणी योजना दुरुस्ती, भोगाव खुर्द आदिवासीवाडी सामाजिक सभागृह, भोगाव बुद्रुक शेवरीची दुरुस्ती, भोगाव बुद्रुक येलंगेवाडी पायर्‍या दुरुस्ती अशा विविध कामांचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply