Breaking News

चोरढे शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा

रेवदंंडा : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्याला चालना देऊन प्रोत्साहन देण्यासाठी चोरढे जिल्हा परिषदेच्या मुरूड तालुक्यातील मराठी शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा उपक्रम शिक्षकवर्गाने राबविला. या वेळी मान्यवर मंडळी व पालकवर्गाने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचा शुभारंभ शाळा समितीचे अध्यक्ष संदीप घाग यांंच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेच्या जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये प्राथमिक तीन फेर्‍या घेण्यात आल्या होत्या. त्यातून महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. महाअंतिम फेरी शनिवारी (दि. 31) रंगली. या वेळी शाळेच्या वतीने चोरढे ग्रामपंचायत सदस्य साकिब गोरमे, मीनाक्षी चोरढेकर, केंद्र प्रमुख सुभाष पाटील, काशिनाथ तांबडे, अक्षय जगताप, संदीप घाग, नामदेव घाग, अनिता मोकल, शेवंती महाडिक, नंदा सुभेदार, सावित्री चोरढेकर, माया महाडिक, माधुरी शेडगे, चंद्रा सावंत, वैशाली गुंड, चंद्रकांत भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. महाअंतिम फेरीमध्ये एकूण 150 प्रश्नांसह सहा राऊंड घेण्यात आले. यात इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या गटात समान 12 गुण झाल्याने पुनश्च प्रश्न फेर्‍या घेण्यात आल्या. एकूण 15 प्रश्न फेर्‍या होऊनसुद्धा समान गुण झाल्याने झटपट प्रश्न फेरी घेण्यात आली. यामध्ये प्रथम उत्तर देणार्‍या गटास विजयी ठरविण्यात आले. यात प्रथम क्रमांक इयत्ता सातवीतील सायली महाडिक, पूर्वी मोकल, वेदांत भोईर, द्वितीय क्रमांक इयत्ता सहावीतील त्रिशा महाडिक, सिद्धी शेडगे, तेजस सुभेदार, तृतीय क्रमांक इयत्ता पाचवीतील वेदांती घाग, कल्याणी घाग, महेंद्र चोरढेकर व चतुर्थ क्रमांक इयत्ता चौथीतील सर्वेश घाग, रेाहन घाग, आदिती सावंत यांनी पटकाविला. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पदक व चषक प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन राजू नाईक, वेळाधिकारी विजय जाधव यांनी केले, तर गुणाधिकारी म्हणून देवानंद गोगर यांनी काम पाहिले. प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी चोरढे शाळेच्या मुख्याध्यापिका उषा हजारे, शिक्षिका संगीता भगत, प्रतिभा वर्तक, शिक्षक विजय जाधव, देवानंद गोगर, राजू नाईक या शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले.

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply