पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 1) कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह मोहीम समारोप कार्यक्रम झाला.
या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले, तसेच शासन आदेशानुसार सर्व उपस्थितांनी कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवडीविषयी प्रतिज्ञा घेतली व गुळसुंदे गावामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाचा सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कारप्राप्त गुळसुंदे येथील शेतकरी संशोधक मिनेश गाडगीळ यांच्या परिवाराचा कृषी दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत गुळसुंदे, आकुळवाडी येथील आदिवासी बांधवांना शेतीच्या बांधावर तूर लागवडीची बियाणे तसेच परसबागेतील भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले तसेच बांधावर तूर लागवड, मग्रारोहयो फळबाग लागवड, खरीप हंगाम भात शेती लागवड, आदिवासी बांधवांसाठी बांबू लागवड, शेवगा लागवड व परसबाग लागवड याबद्दल मार्गदर्शन
करण्यात आले. शेतकरी संशोधक मिनेश गाडगीळ यांनी सेंद्रिय शेतीबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपसरपंच शांताराम मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी, कृषी अधिकारी शालिवाहन पाटील, कृषी पर्यवेक्षक तानाजी दोलतोडे, ग्रामविस्तार अधिकारी मुकेश कांबळे, रवींद्र म्हात्रे, घरत, कृषी सहाय्यक संगीता पाटील, महेश शेंडगे, प्रसाद पाटील, व्ही. एच. पाटील, गणपत गोठळ यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
दरम्यान, पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्रातून युरिया ब्रिगेड खत घेण्यात आले. त्यानंतर हे खत शेतकर्यांना वाटप करण्यात आले.