Breaking News

भारत-रशिया संबंध मजबूत

खासगी उद्योग सहकार्‍यांपर्यंत पोहोचले; पंतप्रधानांचे प्रतिपादन

रशिया : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिवस्तोक येथे आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या पूर्ण सत्रामध्ये भारत-रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केले. भारत-रशिया संबंधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे. त्यामुळे हे संबंध आता केवळ राजकीय संबंध राहिलेले नसून खासगी उद्योगांच्या पक्क्या सहकार्‍यांपर्यंत पोहोचले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केले आहे. व्लादिवस्तोक येथे आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या पूर्ण सत्रामध्ये ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, मी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारत-रशिया सहकार्यासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार हे संबंध केवळ राजकीय पातळीवर न राहता उद्योग क्षेत्रातील सहकार्‍यांपर्यंत नेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही आम्ही ‘सब का साथ-सब का विकास आणि सब का विश्वास’ या मंत्राद्वारे नवभारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहोत. 2024पर्यंत भारताला पाच ट्रिलिअन इकॉनॉमी बनवण्याच्या अभियानातही आम्ही स्वतःला वाहून घेतले आहे.

भारत आणि फार ईस्टचे नाते हे आजचे नाही, खूप जुने आहे. भारत हा पहिला देश आहे ज्याने व्लादिवस्तोकमध्ये आपले वाणिज्य दूतावास स्थापन केले. त्यावेळी आणि त्यापूर्वीही भारत आणि रशियामध्ये अधिक विश्वास होता. सोवितय रशियाच्या वेळीदेखील जेव्हा इतर परदेशी नागरिकांवर व्लादिवस्तोकमध्ये बंदी होती तेव्हा भारतीयांसाठी प्रवेश खुला होता. संरक्षण आणि विकासासंबंधीचे मोठ्या प्रमाणावर सामान व्लादिवस्तोकच्या माध्यमातून भारतात पोहचत होते. याच भागीदारीचा वृक्ष आजही आपली मुळे घट्ट करीत आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.

हे सहकार्याचे संबंध दोन्ही देशांतील लोकांसाठी सुख-समृद्धीचा मार्ग बनले आहेत. भारताने येथे ऊर्जा क्षेत्र आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जसे की हिरे यांच्यामध्ये महत्त्वाची गुंतवणूक केली आहे. सखालिनचे तेल उत्पादन केंद्र भारतीय गुंतवणुकीच्या यशस्वितेचे उत्तम उदाहरण आहे.

राष्ट्रपती पुतीन यांचे फार ईस्टच्या प्रति प्रेम आणि व्हिजन हे केवळ या क्षेत्रासाठीच नाही, तर भारतासारख्या सहकारी देशांसाठीही मोठी संधी घेऊन आले आहे. व्लादिवस्तोक युरेशिया आणि पॅसिफिकचा संगम आहे. त्यामुळे हा भाग आर्कक्टिक आणि उत्तरी समुद्री मार्गासाठी नव्या संधी निर्माण करीत आहे. रशियाचा सुमारे तीन चतुर्थांश भाग हा आशियाचा आहे. त्यामुळे फार ईस्ट या महान देशाची आशियाई ओळख मजबूत करतो. या भागाचा आकार भारतापेक्षा सुमारे दुप्पट आहे. याची लोकसंख्या केवळ सहा दशलक्ष आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply