Breaking News

रोह्यातील पारंगखार येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा

रोहे ः प्रतिनिधी

राज्य आंबा उत्पादक संघ व तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने रोहा तालुक्यातील पारंगखार येथील श्री राम मंदिरात रविवारी (दि. 3) दुपारी 2 वाजता जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके व उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या हस्ते होणार आहे. कृषी अधिकारी महादेव करे, अशोक महामुनी, गजानन पाटील, सतिश पाटील, कृषी शास्त्रज्ञ संतोष सहाणे आदी मान्यवर या मेळाव्यात आंबा, भाजीपाला व सर्व प्रकारचे फलोत्पादन यावर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी भरविण्यात येणार्‍या प्रदर्शनात प्रभावी सेंद्रिय औषधे तसेच जीवामृत बनविण्याचे तंत्रज्ञान यांचे सादरीकरण करण्यात येईल. आंबा नैसर्गिकरित्या पिकवण्याचे व सुस्थितीत ठेवण्याचे प्रात्यक्षिक या वेळी दाखविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा व मेळाव्याचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे  यांनी केले आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply