Breaking News

पत्रकार चषकात कोप्रोली संघाची बाजी

पनवेल : बातमीदार

पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरेपाडा येथील मैदानावर पत्रकार चषक 2019चे आयोजन करण्यात आले होते. या चषकावर कोप्रोली संघाने आपले नाव कोरले, तर पाली संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

27 फेब्रुवारी रोजी पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन पंकज तांबडे व गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा यांच्या वतीने करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत कोप्रोली, उमरोली, नेरेपाडा, नेरे, चिपळे, विहिघर, पाली, बोनशेत या 8 संघांनी सहभाग घेतला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, सदस्य, माजी उपसरपंच, संपादक, पत्रकार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतिम सामन्यात कोप्रोली संघाने पाली संघावर विजय मिळवत 30 हजार रुपये व भव्य ट्रॉफी पटकावली, तर पाली संघाला 15 हजार रुपये व ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून मंगेश फडके याला, तर मालिकावीर म्हणून अविनाश याला गौरविण्यात आले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply