Breaking News

मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना घरी जाण्यास परवानगी

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये गेले 36 दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे तसेच त्यांना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत. त्याचप्रमाणे या सर्वांना प्रवासाची परवानगी देण्याआधी तपासणी केली जाणार असून, कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply