कळंबोली ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांनी कळंबोलीकरांना उत्तम सोयी-सुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शहरात ज्येष्ठ नागरिकांपासून सर्वांना आरामात विरंगुळा घेता यावा, म्हणून 50 बेंचेस बसविण्यात आले आहेत. नगरसेवक निधीतून हे पहिलेच काम करण्यात आले असून नगरसेविका प्रमिला पाटील यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. जनतेला मूलभूत सुविधा देणे प्रशासन व सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे. विभागातील विकास करता यावा, यासाठी प्रत्येक नगरसेवकाला समान निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीचा वापर प्रथमच पनवेल महानगरपालिकेतून होत आहे. त्याचा वापर नगरसेविका सौ. पाटील यांनी विकास योग्य पद्धतीने व्हावा, याचा विचार करून या निधीचा वापर त्यांच्या नगरसेवक निधीतून कळंबोली प्रभाग 7मध्ये बेंचेस बसविले आहेत. कळंबोली शहरातील लोकसंख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. या शहरात सुविधांचा वणवा असून महानगरपालिका अस्तित्वानंतर सिडकोने आपली जबाबदारी झटकल्यामुळे नागरिकांना अनेक सोयीसुविधाना मुकावे लागत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात याठिकाणी सोयी-सुविधा निर्माण करण्यासह कल्याणकारी कार्य करणे आवश्यक आहे. हे काम पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली प्रभाग 7च्या नगरसेविका प्रमिला पाटील करत आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहेत.